पुणे, १९ सप्टेंबर २०२२ : टी ट्वेंटी वर्ल्डकप सुरू होण्याआधी भारताकडे ऑस्ट्रेलियाच्या निमित्ताने नवे प्रयोग करण्याची संधी आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये टी ट्वेंटी वर्ल्डकप सामन्यांना सुरुवात होणार आहे. २० सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या या मालिकेसाठी टीम इंडिया मोहाली येथे पोहोचली आहे. दरम्यान कर्णधार रोहित शर्मा याने नुकतीच प्रेस कॉन्फरन्स घेत भारताकडून सलामी जोडी कशी असेल याबाबत सविस्तर माहिती दिली.
कर्णधार रोहीत शर्माने रविवारी पत्रकार परिषद घेतली. सर्वात लहान फॉरमॅटमध्ये सलामी जोडी म्हणून विराट कोहली च्या प्रश्नावर रोहित म्हणाला, विराट कोहली हा आमच्यासाठी टी-२० विश्वचषकासाठी निश्चितच सलामीचा पर्याय आहे. आणि आम्ही ते नेहमी लक्षात ठेवू. विश्वचषकात जाण्यासाठी संघात लवचिकता असणे आवश्यक आहे.
त्यानंतर रोहित म्हणाला आमच्याकडे विराट कोहली सलामी वीर फलंदाज म्हणून पर्याय आहे. कोहली आमच्यासाठी तिसरा सलामीवीर फलंदाज असेल पण टी-२० विश्वचषकासाठी केएल राहुलच टीम इंडिया साठी ओपनिंग करणार. रोहीत पुढे म्हणाला आम्हाला आमच्या संघातील सर्व खेळाडूंची गुणवत्ता समजते. ते आमच्यासाठी काय करू शकतात हे आम्हाला माहित आहे. विराट आमच्यासाठी एक महत्त्वाचा पर्याय आहे.
राहुल ने भारतासाठी २०१६ पासून ते आतापर्यंत ६२ टी ट्वेंटी सामने खेळले आहेत .यामध्ये त्यांनी ५८ डाव खेळत ४० च्या सरासरीने १९७० धावा केल्या आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव