काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यात आली. शपथविधीसाठी अवाढव्य अशी सजावट करण्यात आली होती. भला मोठा शपथविधी ठेवण्यात आला. परंतु एका बाजूला राज्यात भयंकर ओला दुष्काळ पडला आहे. गेला एक महिना बळीराजा मदतीच्या हके ची अपेक्षा ठेवून बसला आहे. आधीच सरकार स्थापनेत या नेते मंडळांनी विलंब केला आहे आणि त्यात अशा थाटामाटात शपथ घेऊन हे शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळत असल्यासारखे वाटत आहे.
सध्या महाराष्ट्रासमोर अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान आणि वाढता कर्जाचा बोजा ही दोन आव्हाने आ वासून उभी आहेत. तर एका बाजूला बेरोजगारीचा ही प्रश्न डोके वर काढण्याचा प्रयत्न करत आहे. याचे या नेतेमंडळींना किती गांभीर्य आहे हे या प्रकारातून दिसून येत आहे.