कॉंग्रेस नेत्याची राष्ट्रपतींवर टीका; एनसीडब्ल्यूने पाठवली नोटीस

नवी दिल्ली, ६ ऑक्टोबर २०२२: काँग्रेस नेते उदित राज यांनी बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल वादग्रस्त ट्विट केले होते. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, द्रौपदी मूर्मू यांच्यासारखा राष्ट्रपती कोणत्या देशाला न मिळो, चमचेगिरीची देखील हद्द असते. त्यांच्यामते ७० टक्के लोक हे गुजरातचे मिठ खातात, स्वतः मिठ खाऊन जगा तरच कळेल. राज यांच्या या वक्तव्यावरुन आता गदारोळ सुरु झाला आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) नोटीस जारी केली आहे.

उदित राज यांच्या ट्विटवर राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) नोटीस जारी केली आहे. एनसीडब्ल्यूने त्यांना त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागण्यास सांगितले आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी ट्विट केले की, ‘देशाची सर्वोच्च शक्ती आणि तिच्या मेहनतीने इथपर्यंत पोहोचलेल्या महिलेविरोधात अतिशय आक्षेपार्ह विधान आहे. उदित राज यांनी आपल्या अपमानास्पद आणि अवमानकारक वक्तव्याबद्दल माफी मागावी असे म्हटले आहे.

हे माझे व्यक्तिगत विधान

दरम्यान, इकडे वाद वाढल्यानंतर राज यांनी आणखी एका ट्विटमध्ये स्पष्टीकरण दिले आहे. हे मत काँग्रेसचे नसून माझे वैयक्तिक विधान असल्याचे उदित राज यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, माझ्यासारख्या दुबे, तिवारी, अग्रवाल, गोयल, राजपूत यांसारख्या द्रौपदी मुर्मूजींना कोणी प्रश्न विचारला असता तर पदाची प्रतिष्ठा पणाला लागली असती. आम्ही दलित-आदिवासींवर टीका करू आणि त्यांच्यासाठीही लढू.

न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा