आदिपुरुष च्या वादावर दिग्दर्शक ओम राऊत स्पष्टच बोलला

10

मुंबई, १० ऑक्टोबर २०२२ : सध्या सोशल मीडियावर एकच ट्रेंड चालू आहे. तो म्हणजे बॉयकॉट आदिपुरुष या चित्रपटाच्या टीझर वरून सगळीकडेच खूपच वातावरण तापला आहे, बाहुबली स्टार प्रभासचा श्रीराम यांचा लुक आणि सैफ अली खानच्या रावणाच्या लूकवरून हा सिनेमा सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

आदिपुरुष चित्रपटाच्या थ्रीडी टीझर लॉच दरम्यान चित्रपटावर होणारी टीका वरती दिग्दर्शक ओम राउत यांनी पहिल्यांदाच भाष्य केल आहे. त्यांच्या मते चित्रपटात मी काहीही चुकीचं दाखवलेलं नाही, आम्ही इतिहासाशी कुठल्याही प्रकारची छेडछाड केलेली नाही. तुम्ही ९५ सेकंदाच्या टीझर वरून कोणत्याही गोष्टीचा अनुमान काढू शकत नाही.

ओम राउत यांच्या मते रावण हा माझ्यासाठी आजही राक्षस आहे. पण मी या रावणाला वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो. मी विचार केलेला रावणाला मोठ्या मिशी नाही आहेत. पण यामुळे जर तुम्ही असं म्हणत असाल की रावणाचा रंग आणि रूप मी बदललेलं आहे, तर ते पूर्ण चुकीचं आहे. माझा रावण सुद्धा राक्षसी रावण आहे. पण मी त्याला आजच्या काळानुसार दाखवलेला आहे, आजच्या काळात रावण जितका क्रूर दाखवता येईल तेवढा दाखवायचा मी प्रयत्न केला आहे.

ओम राउत शेवटी म्हणाला चित्रपटाबद्दल जे काही बोलले जात आहे सुचवलं जात आहे, त्यांच्या वक्तव्यावर आम्ही लक्ष देत आहोत, त्यांचं म्हणणं समजून घेत आहोत. पण चित्रपट जेव्हा जानेवारीला प्रदर्शित होईल तेव्हा नक्कीच तुमची निराशा होणार नाही याची मी खात्री देतो.

दरम्यान हा सिनेमा १२ जानेवारी २०२३ ला एकच वेळी हिंदी, तेलगू, तामिळ ,मल्याळम ,आणि, कन्नड भाषा मध्ये रिलीज होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव