पुणे, १० ऑक्टोंबर २०२२ : आपण कामासाठी दिवसभर लॅपटॉप वापरतो तेव्हा बऱ्याचवेळा लॅपटॉप गरम झाल्याचे जाणवते. सततच्या वापरामुळे तो गरम होत असेल असे वाटून आपण त्याकडे सहज दुर्लक्ष करतो पण यामुळे त्याची कार्यक्षमता कमी होते. त्यासाठी लॅपटॉप गरम होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते. पण यासाठी कोणते उपाय करता येतील हे बऱ्याच जणांना माहित नसते. लॅपटॉप दीर्घकाळासाठी नीट काम करावा, सतत गरम होऊ नये यासाठी कोणते उपाय करता येतील जाणून घ्या.
लॅपटॉपचे धुळीपासून संरक्षण करा
लॅपटॉपच्या आत वायुवीजन आणि उष्णता नियंत्रित करण्यासाठी CPU पंखे असतात. कालांतराने आणि योग्य देखभालीअभावी त्याच्या पात्यांवर भरपूर धूळ साचते. अशा परिस्थितीत लॅपटॉपच्या आत वायुवीजन व्यवस्थित होत नाही. यामुळे ते गरम होऊ लागते. अशा स्थितीत लॅपटॉपमधील धूळ साफ करावी. यामुळे वायुवीजन सुधारेल आणि CPU पंखे उष्णता नियंत्रणात ठेवतील. लॅपटॉपमधील धूळ साफ करण्यासाठी तुम्ही लॅपटॉप इंजिनिअरची मदत घेऊ शकता. याशिवाय, जर तुम्हाला लॅपटॉप हार्डवेअरचे चांगले ज्ञान असेल, तर तुम्ही सॉफ्ट ब्रशच्या मदतीने सीपीयू आणि कुलिंग सिस्टममध्ये साचलेली धूळ स्वतः साफ करू शकता.
तुमचा लॅपटॉप सारखा चार्जर वापरा अनेक वेळा आपण आपला लॅपटॉप इतर एखाद्या चार्जरने चार्ज करतो. या परिस्थितीत, तो जास्त गरम होण्याची शक्यता खूप वाढते आणि लॅपटॉपमध्ये अनेक समस्या देखील उद्भवू शकतात. तुमचा लॅपटॉप नेहमी त्याच्याच चार्जरने चार्ज करा.
अनेकजणांना पुर्ण दिवस लॅपटॉप चार्जिंगला लावून काम करण्याची सवय असते, पण यामुळे लॅपटॉप गरम होऊन त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लॅपटॉपला ओव्हर चार्ज करू नये.
आवश्यक नसलेले ॲप्लिकेशन बंद करा
काम करत असताना एका वेळी अनेक ॲप्लिकेशन सुरू असतात यामुळे लॅपटॉप गरम होण्याची शक्यता असते. त्यामुळे बॅकग्राऊंड मध्ये सुरू असणारे आवश्यक नसलेले ॲप्लिकेशन बंद करा.
न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे