गोवा किनार्‍यावर MiG- 29K लढाऊ विमान क्रॅश

गोवा, १२ ऑक्टोबर २०२२: गोव्यात शनिवारी दुपारी आयएनएस हंसा येथून ट्रेनिंगसाठी रवाना झालेले MiG-29K लढाऊ विमान उड्डाणा नंतर काही वेळातच दुर्घटनाग्रस्त झाले. सुदैवाने या लढाऊ विमानातील दोन्ही पायलट सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, MiG- 29K या प्रशिक्षणार्थी विमानाच्या इंजिनमध्ये अचानक आग लागली अशी माहिती नौदल प्रवक्ता कमांडर, विवेक मधवाल यांनी माध्यमांशी बोलताना दिली. आग लागल्यामुळे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, सुदैवाची बाब म्हणजे या अपघातात वैमानिक पायलट कॅप्टन एम. शोकंद आणि लेफ्टनंट कमांडर दीपक यादव यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती भारतीय नौदलाकडून देण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा