मस्क यांचा चर्चांना पूर्णविराम…

वॉशिंग्टन, १२ ऑक्टोबर, २०२२ : टेस्लाचे संचालक इलॉन मस्क यांनी रशियाचे पंतप्रधान पुतिन यांना फोन करुन त्यांना शांतता प्रस्थापित करण्याबाबत संदेश दिला होता. त्यात त्यांनी युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केला असल्याचं नमूद केलं होतं. अशा प्रकारची बातमी नुकतीच प्रसिद्ध झाली होती. त्यानुसार अनेक प्रांतात चर्चादेखील सुरु झाली होती. तसेच ईमेलमध्ये त्यांनी क्रिमियाच्या संदर्भात बातचीत करुन पुतीन युद्धाच्या संदर्भात तडजोड करणार असल्याचं सांगितलं होतं.

पण इलॉन मस्क यांनी या बातमीचे खंडण केले आहे. या बातमीवर स्पष्टीकरण देताना मस्क यांनी सांगितले की, मी सध्याच्या काळात अजिबात पुतिन यांना फोन केला नाही. मी त्यांना १८ महिन्यांपूर्वी फोन केला असून तो मी सोशल मिडीयावरच्या स्पेससंदर्भात केला होता.

मागच्या महिन्यात मस्क यांनी फेसबुकवरुन रशिया-युक्रेन युद्धाच्या संदर्भात पोल सुरु केला होता. त्यात युद्ध थांबवण्याच्या अनेक कल्पना मांडून हो किंवा नाही अशा अर्थाचे पर्याय समोर ठेवले होते. त्याला मतदान करण्याचे त्यांनी सांगितले होते.

या संदर्भातला एक रिपोर्ट युरेशियाचे आयन ब्रेमार यांनी ईमेल मध्ये प्रसिद्ध केला होता. ज्यात त्यांनी लिहीले होते, की पुतीन झेलेस्कीबरोबर तडजोड करणार असून त्यानुसार क्रिमिया रशियाकडेच राहिल आणि संलग्नीकरणातून लुहानस्तक, दोनेस्तक, खारकिव्ह आणि झापोर्झिया हे युक्रेनकडेच राहतील. पण हे सगळं चांगल्या पद्धतीने बाहेर आलं पाहिजे, असं ब्रेमार यांनी ईमेलमध्ये लिहीलं होतं.

मात्र या सगळ्यावर युक्रेनचे माजी राजदूत अंद्राजी मेलयांक यांनी मस्कच्या पर्यायावर अतिशय बेधडक आणि वाईट भाषेत उत्तर दिलं होतं.

त्यामुळे आता मस्कनी सगळ्याच पर्यायांना स्पष्ट उत्तर देत सांगितले की, मी आता कोणताही संवाद पुतिन यांच्याशी केला नाही. असं म्हणत त्यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा