कुणावरही दबाव नाही; देवेंद्र फडणवीस

मुंबई, १३ ऑक्टोंबर २०२२ : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील शिवसेनेच्या अडचणी वाढतंच चालल्या आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा महानगरपालिका कर्मचारी पदाचा राजीनामा स्वीकारण्यास विलंब होत असल्यामुळे ठाकरे गट कोर्टात धाव घेणार आहे. तर महापालिका अधिकाऱ्यांवर शिंदे गटाकडून दबाव आणला जात असल्याचा असा आरोप केला जात आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस बोलतात की कोणाचाही राजीनामा स्वीकारण्यासंदर्भात काही नियम असतात. त्या नियमांनुसारच राजीनामा स्वीकारायचा असतो. महापालिका स्वायत्त आहे. महापालिका ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेईल. त्याबद्दल मी काही सांगू शकत नाही. नियम सर्वांसाठीच सारखे असतात. या प्रकरणात सरकारकडून दबाव आणण्याचा प्रश्न नाही. कोणतीही व्यक्ती कोणत्याही बाजूने निवडणूक लढवू शकते, असे बोलत देवेंद्र फडणवीस यांनी आपल मत स्पष्ट केल आहे.

तसेच अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठीच्या शिंदे-गट आणि भाजपाच्या संभाव्य उमेदवारावरही देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार आहोत. कोण उमेदवार द्यायचा याचा निर्णय चर्चेतून घेतला जाणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटलं. दरम्यान महापालिका पूर्णपणे स्वयत्ता आहे. राजीनामा घेण्याबाबत त्यांचे निर्णय आहे. सरकार काहीही हस्तक्षेप करत नाही. त्यात आमचा हस्तक्षेप नाही. आमच्याकडून ही कोण निवडणूक लढणार याची घोषणा आम्ही लवकरच करू, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

शिंदे गटाला मिळालेल्या निवडणूक चिन्हावरही देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. त्यांनी ढाल-तलवार या निवडणूक चिन्हावर टीका करणाऱ्यांवर टीका केली आहे. “ढाल-तलावर हे मराठ्यांचे, छत्रपती शिवाजी महाराज यांचे चिन्ह आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचे प्रतिक असेलेली ही ढाल-तलावर आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चिन्हालाच गद्दारांचे चिन्ह म्हणणे यापेक्षा मोठी गद्दारी नाही, असेही देवेंद्र फडणवीस या वेळी म्हणाले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा