पुणे, १६ ऑक्टोबर २०२२ : आजपासून ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषकाचा पहिला पात्रता फेरीतील सामना श्रीलंका आणि नामिबिया यांच्यात झाला. या सामन्यात नमिबिया संघाने ऐतिहासिक विजय मिळवत, स्पर्धेची दमदार सुरुवात केली आहे. नामिबियाने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १६३ धावा केल्या, त्यानंतर श्रीलंकेचा संघ मात्र १९ षटकात १०८ धावा करून ऑल आऊट झाला.
दरम्यान श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, नामिबिया संघाने २० षटकात १६३ धावा केल्या, आणि विजयासाठी १६४ धावांचा आव्हान दिलं. नामिबिया कडून सर्वाधिक ४४ धावा फ्रीलिंकन ने केल्या. त्याचबरोबर सिमटन ने ३१ धावा केल्या, यामुळे नामिबियाने १६३ धावा स्कोरबोर्डवर लावल्या.
प्रत्युत्तरात श्रीलंकेच्या सलामीवर मैदानात उतरले, त्यावेळी हे लक्ष सहज गाठेल अशी आशा होती. पण तसे घडले नाही. सुरुवातीला बसलेल्या झटक्यानंतर श्रीलंकेची फलंदाजी सावरलीच नाही आणि १९ व्या षटकात अवघ्या १०८ धावावर श्रीलंकेचा डाव आटोपला आणि नामिबियाने ५५ धावांनी मोठा विजय मिळवला.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव