चेन्नई, १७ ऑक्टोबर २०२२: दिवाळी जवळ येताच खासगी, सरकारी कर्मचाऱ्यांना वेध लागतात ते गिफ्ट्स आणि बोनसचे. सर्वत्र काय बोनस मिळणार ? याचीच चर्चा पाहायला मिळते. चेन्नईतील एका सराफा व्यापाऱ्याने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून जे गिफ्ट दिले आहे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या मालकाने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून १ कोटी २० लाख किमतीच्या बाईक आणि कार दिल्या आहेत.
Chennai, Tamil Nadu | A jewellery shop owner gifted cars and bikes to his staff as Diwali gifts
They have worked with me through all ups and downs. This is to encourage their work. We are giving cars to 10 people and bikes to 20: Jayanthi Lal, owner of the jewellery shop (16.10) pic.twitter.com/xwUI0sgNRn
— ANI (@ANI) October 17, 2022
कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू!
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, चेन्नईतील चलनी ज्वेलर्सचे मालक जयंती लाल यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून ८ कार आणि १८ बाईक भेट दिल्या आहेत. या कर्मचाऱ्यांनी चढ-उताराच्या काळातही आम्हाला साथ दिली आहे. त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी ही भेट आहे, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, दिवाळी निमित्त मिळालेल्या या भेटीनंतर काही कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले तर काहींना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
माझा स्टाफ म्हणजे माझे कुटुंब!
जयंती लाल म्हणाले, माझा स्टाफ हा माझ्यासाठी माझ्या कुटुंबाप्रमाणेच आहे. ही भेट त्यांच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्यात काहीतरी नवीन सुरुवात करण्यासाठी आहे. मी कुटुंबप्रमुख या नात्याने घरातील व्यक्तींप्रमाणेच यांनाही सरप्राईज गिफ्ट दिले आहे. कारण, माझ्या व्यवसायातील नफ्यात यांचाही मोलाचा वाटा आहे, असेही जयंतीलाल यांनी म्हटले.
याआधी सुरतचे अब्जाधीश हिरे व्यापारी सावजी ढोलकिया यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना फ्लॅट, कार आणि इतर मौल्यवान भेटवस्तू दिल्याने बरीच चर्चा झाली होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.