पुणे, १७ ऑक्टोबर २०२२ : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज टी ट्वेंटी विश्वचषकापूर्वी सराव सामना झाला. ब्रिसबनच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या हातातील विजय खेचून आणून शमी ने टीम इंडियाला विजय मिळवून दिला. शेवटच्या षटकात अवघ्या काहीच धावांची गरज असताना मोहम्मद शमीने अत्यंत महत्त्वाच्या चार विकेट्स घेत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.
प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकात ७ गडी गमावून १८६ धावा केल्या, भारताकडून के एल राहुल ५७ धावांची वेगवान खेळी केली. तर सूर्यकुमार यादवने ३३ चेंडूवर शानदार अर्धशतकी खेळी केली, त्याचबरोबर दिनेश कार्तिक यांने २० धावांचे महत्वाचं योगदान दिल. परिणामी भारतीय संघाने ७ बाद १८६ अशी आव्हानात्मक धावसंख्या रचली.
प्रतिउत्तरात ऑस्ट्रेलियाने १९ षटकात ६ गडी गमावून १७६ धावा केल्या. ऑस्ट्रेलिया कढून कर्णधार फिंच ने सर्वाधिक ७६ धावांची धडाकेबाज खेळी केली, त्याचबरोबर मिचेल मार्शने ३५ तर मॅक्सवेंलने २३ धावांची खेळी केली त्यानंतर कोणालाही चांगली कामगिरी करता आली नाही.
दरम्यान ऑस्ट्रेलियाला शेवटच्या षटकात विजयसाठी ११ धावांची गरज होती. तेव्हा रोहितने मोहम्मद शमी ला अखेरचे षटक टाकण्यासाठी बोलावलं या षटकात शमी ने केवळ ४ धावा देत भारतीय संघाला विजयी केलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव