हिमाचल प्रदेशमध्ये भाजपची पहिली यादी जाहीर!

शिमला, १९ ऑक्टोबर २०२२: हिमाचल विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत भाजपने मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्यासह ६२ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. सीएम जयराम ठाकूर सेराज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर दुसरीकडे उना विधानसभेतून भाजपने सतपाल सिंग सत्ती यांना उमेदवारी दिली आहे. अनिल शर्मा यांना भाजपने मंडीतून तिकीट दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या ६२ उमेदवारांच्या या यादीत पाच महिलांचाही समावेश आहे. पक्षाने प्रेमकुमार धुमल आणि त्यांचे मित्र गुलाब सिंग यांना तिकीट दिलेले नाही. याआधी २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या दोघांनाही तिकीट मिळाले होते पण दोघांनाही पराभवाला सामोरे जावे लागले होते. तर मंडीचे तगडे नेते महेंद्रसिंह ठाकूर यांनाही तिकीट नाकारण्यात आले असून, तर त्यांचे पुत्र रजत ठाकूर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

काँग्रेसने मंगळवारी जाहीर केली ४६ उमेदवारांची यादी !

याआधी मंगळवारी म्हणजेच १८ ऑक्टोबर रोजी कॉंग्रेसने हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी ४६ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पक्षाचे विधिमंडळ पक्ष नेते मुकेश अग्निहोत्री यांना हरोली मतदारसंघातून, तर माजी मंत्री आशा कुमारी यांना डलहौसी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत २५ ऑक्टोबर असून हिमाचल प्रदेशातील सर्व जागांसाठी एकाच टप्प्यात १२ नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. तर ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा