मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मंत्री भुमरेंच्या मावसभावाचा अपघाती मृत्यू

पुणे, १९ ऑक्टोंबर २०२२ : औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड ग्रामपंचायतचे माजी सरपंच तथा रोहयो मंत्री संदिपान भुमरेंचे मावस भाऊ अंबादास नरवडे यांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करत असतानाच त्यांच्या गाडीचा अपघात झाला, ज्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. तर इतर दोन जन जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेने पैठण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अंबादास नरवणे हे मुंबईच्या दिशेने जात असताना कामशेतजवळ त्यांच्या गाडीने पुढे चालत असलेल्या टेम्पोला धडक दिली. त्यानंतर इनोव्हा गाडी रस्ता दुभाजकाला जाऊन धडकली. या अपघातात नरवणे यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे
या अपघाताच्या घटनेनंतरपाचोड गावात आणि भुमरे यांच्या मतदारसंघात या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. नरवडे हे भुमरे यांचे मावस भाऊ होते. सोबतच स्थनिक राजकारणात एक सक्रीय नेते म्हणून नरवडे यांची ओळख होती.

दरम्यान, नरवणे यांच्यासोबत त्यांच्या गाडीचे चालक आणि त्यांचे मित्र होते. या अपघातात हे दोघेही जखमी झाले असून नरवणे यांचा मृत्यू झाला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे