पुणे- बँकॉक विमानसेवा उड्डाण

पुणे, २१ ऑक्टोबर २०२२ : लोहगाव विमानतळावरून पुणे ते बँकॉकदरम्यान १२ नोव्हेंबरपासून विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्पाइस जेट एअरलाइन्स या कंपनीकडून आठवड्यातून चार दिवस ही सेवा दिली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी पुणे-सिंगापूर विमान सेवा दि. २ डिसेंबरपासून सुरु करण्याचे जाहीर केले होते. सोबतच आता मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार असे चार दिवस पुणे- बँकॉक विमानसेवा सुरू होत आहे.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरचे माजी अध्यक्ष सुधीर मेहता म्हणाले, की गेल्या दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी नागरी हवाई उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे पाठपुरावा केला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही मदत झाली. त्यानुसार आता बँकॉक आणि सिंगापूरसाठी पुण्याहून थेट विमानसेवा सुरू होत आहे. आता जगाच्या पूर्व भागाशी पुणे आता चांगल्या पद्धतीने जोडले जाईल.

पुण्याहून रात्रीच्या वेळी सिंगापूर, बँकॉकसाठी विमानसेवा सुरु करण्यात यावी असा प्रस्ताव पुणे विमानतळ प्राधिकरणाने हवाई मंत्रालयाला दिले होते. तसेच खासदार गिरीश बापट यांनी देखील या संदर्भात हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केलेला. पुणे (लोहगाव) विमानतळावरून देशांतर्गत विमानांची संख्या वाढली असली तरीही केवळ एकच आंतरराष्ट्रीय उड्डाण सुरु आहे. काही वर्षांपूर्वी पुण्याहून सिंगापूर, दुबई, मस्कत, फ्रँकफर्ट आदींसाठी पुण्याहून आंतरराष्ट्रीय विमाने उड्डाणे होत. पण आता केवळ दुबईसाठीच विमानसेवा सुरु आहे. त्यामुळे पुणे ते बँकॉकदरम्यान १२ नोव्हेंबरपासून विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा