आसाममध्ये तीन पीएफआय सदस्य आणि अन्य एका व्यक्तीला अटक

कामरूप (आसाम) २१ ऑक्टोबर २०२२: पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच पीएफआय या बंदी घातलेल्या संघटनेवर देशाच्या विविध भागात कारवाई सुरू आहे. महाराष्ट्रातील पनवेलनंतर शुक्रवारी आसाम पोलिसांनी आसाममधील कामरूप जिल्ह्यातून प्रतिबंधित पीएफआयच्या ३ सदस्यांना अटक करण्यात आली आहे. आणखी एका व्यक्तीलाही ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना कामरूप जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणाले की, पोलिसांनी आज सकाळी आसाममधील कामरूप जिल्ह्यातील नागरबेरा भागातून प्रतिबंधित पीएफआयच्या तीन सदस्यांना अटक केली. यासोबतच प्रतिबंधित पीएफआयशी संबंधित आणखी एका व्यक्तीलाही ताब्यात घेण्यात आले आहे.

PFI वर पाच वर्षांसाठी बंदी

गेल्या महिन्यात, राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) आसाम पोलिसांसोबत राज्याच्या अनेक भागांमध्ये छापे टाकून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या दहा नेत्यांना अटक केली होती. गेल्या महिन्यात केंद्र सरकारने दहशतवादी संबंधांच्या आरोपावरून पीएफआयवर पाच वर्षांसाठी बंदी घातली होती.

महाराष्ट्रातून चार PFI सदस्यांना अटक

पनवेलमध्ये पीएफआय सदस्यांची बैठक झाल्याची गुप्त माहिती महाराष्ट्र एटीएसला मिळाली होती. यानंतर एटीएसने कारवाई करत पीएफआयच्या ४ सदस्यांना पनवेलमधून अटक केली. अटक करण्यात आलेले सदस्य राज्य विस्तार समितीचे स्थानिक सदस्य, एक स्थानिक सचिव आणि उर्वरित दोन कार्यकर्ते आहेत. एटीएस म्हणजेच दहशतवाद विरोधी पथक या प्रकरणाचा तपास करत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा