मणिपूरमध्ये भूकंपाचा धक्का, रिश्टर स्केलवर ३.३ तीव्रता

मणिपूर, २४ ऑक्टोंबर २०२२: मणिपूरमध्ये रविवारी २३ ऑक्टोबर रोजी रात्री ११.४१ वाजता भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. त्यानंतर लोक घराबाहेर पडले. वृत्तसंस्थेनुसार, मणिपूरच्या थौबलमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.३ इतकी मोजली गेली. भूकंपाची खोली जमिनीखाली ४० किमी होती. सद्यस्थितीत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही.

याआधी २० ऑक्टोबरला गुजरातमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. भूकंपाचा केंद्रबिंदू सूरतपासून ६१ किमी अंतरावर होता. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.५ इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, सकाळी १०.२६ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले.

गेल्या १ महिन्यात ३५ वेळा भूकंपाचे धक्के

१ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर दरम्यान भारतात ३५ भूकंप झाले. महाराष्ट्रात सर्वाधिक ७ वेळा, लडाखमध्ये ४ वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. महाराष्ट्रातील भूकंपाची तीव्रता १.७ ते २.६ इतकी होती. अरुणाचल प्रदेशात २, आसाममध्ये ३, गुजरातमध्ये २, हिमाचलमध्ये २, जम्मू-काश्मीरमध्ये ३, मणिपूरमध्ये ३, मेघालयमध्ये १, पंजाबमध्ये १, राजस्थानमध्ये १, उत्तराखंडमध्ये १ आणि अंदमान मध्ये ३ वेळा भूकंपाचे धक्के जाणवले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा