गडचिरोली, २६ ऑक्टोबर २०२२ : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. दरम्यान नक्षलग्रस्त भागातील पोलिसांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिवाळी साजरी केली. तरी २४ ऑक्टोबरला सोमवारी देशाचे पंतप्रधान मोदी यांनी कारगिलला जावून भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी केली. तर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोलीतील पोलिसांबरोबर दिवाळी साजरी केली असल्यानं मुख्यमंत्री पंतप्रधानांची कॉपी तर करत नाही आहे ना असा टोला विरोधकांकडून लगवण्यात येत आहे. तर मुख्यमंत्री होण्यापूर्वीचं एकनाथ शिंदे आणि गडचिरोली जिल्ह्याचं विशेष नातं असल्याचं कायमचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात. कारण महाविकास आघाडी सरकारामध्ये एकनाथ शिंदे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते. तेव्हाही ते कायमच गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करायचे. तरी हा दौरा काही नवीन नाही असं मत शिंदे गटाचं आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे
पालकमंत्री असताना माझं विकासाचं टार्गेट असताना मी दरवर्षी गडचिरोली पोलिसांसह दिवाळी साजरी करत होतो. आज मी मुख्यमंत्री आहे. पण गडचिरोलीचा पालकमंत्री असताना सुरू केलेले काम मी अजूनही सुरू ठेवले आहे. अतिदुर्गम भागात पोलीस नक्षलवाद्यांशी लढून आपलं संरक्षण करतात. त्यांना दिवाळीचा आनंद घेता यावा हाच उद्देश आहे. काल भामरागड आऊटपोस्टमध्ये पोलिसांसह दिवाळी साजरी केली आहे. त्यामुळे पोलिसांचे मनोबल वाढेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले
नक्षलवाद ही समस्या
गडचिरोली जिल्ह्यात काम करणारे पोलीस हे आपल्या कुटुंबापासून दूर राहून आपले कर्तव्य बजावत असतात. आजच्या दिवशी त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणे हा सर्वोच्च आनंदाचा क्षण असल्याची भावना याप्रसंगी व्यक्त केली. पालकमंत्री असताना दिवाळी पोलिसांसोबत साजरी करीत होतो. आता हळूहळू गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद संपत असल्याचा आनंद असल्याचं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे. पोलिसांनी गडचिरोलीतील नक्षलवादांचा बीमोड केलेला आहे. मात्र, शहरही नक्षलवाद ही समस्या असून याकडे सरकार गांभीर्याने लक्ष घालत असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी कारगीलमध्ये :
भारतीय सैनिकांच्या शौर्यासमोर आकाशही झुकतं. कारगिलचे क्षेत्र भारतीय सेनेच्या शौर्याचं प्रतीक आहे. शिखरावर बसलेला शत्रूही भारतीय सैनिकांच्या शौर्यासमोर छोटा होतो. भारताचे सैनिक सीमेचे रक्षक असून देशाचे आधार स्तंभ आहात. तुम्ही देशाच्या सीमेवर आहात म्हणून देशातले लोक सुखात आहेत. देशाच्या सुरक्षेला संपूर्णता देण्यासाठी आपला प्रत्येक नागरिक प्रयत्न करत आहे. देशाची सीमा सुरक्षित असते. अर्थव्यवस्था सुदृढ असते आणि समाज आत्मविश्वासात असतो तेव्हाच देश सुरक्षित असतो असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड