मुंबई, २६ ऑक्टोबर २०२२ : देशाची अर्थव्यवस्था आता मंदीच्या दिशेने वाटचाल करत आहे. बॅंक सतत व्याजदरात वाढ करत आहे. विकास दर कमी होत आहे. त्यामुळे आता सर्वसामांन्यावर महागाईचा बोजा वाढत आहे. त्यामुळे आता देशाचे कर्ज वाढत आहे. असे रॉयटरच्या सर्व्हेदरम्यान दिसून आले आहे. याचा वाईट प्रभाव देशावर पडत आहे.
मात्र लवकरच हा महागाई दर कमी होऊन त्यामुळे विकासदरात वाढ होईल, असे अर्थतज्ञांचे मत आहे. मात्र सध्या घटता विकासदर आणि वाढती बेरोजगारी यामुळे अशी परिस्थिती ओढवली आहे. तसेच अर्थतज्ञांचे मत आहे की पुढच्या वर्षी केंद्रीय बॅंका व्याजदर वाढवून या परिस्थितीला ताब्यात आणतील असेही, त्यांनी सांगितले.
विकासदर २.३ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. हा दर २.९ जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी बेरोजगारीमध्ये घट होईल. २०२३ मध्ये हा दर ३ पर्यंत वाढू शकतो, असेही त्यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर पुढच्या वर्षात अमेरिका पूर्णपणे मंदीच्या जाळ्यात सापडू शकते. याचा परिणाम संपूर्ण जगावर पडू शकतो. खास करुन भारतावर याचा जास्त परिणाम होऊन भारतात मंदी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आतापासूनच भारताने यावर काम करण्यास सुरुवात केली पाहिजे, असं मत ब्लूमबर्गच्या रिपोर्टद्वारा जाहीर करण्यात आले आहे.
त्यामुळे आतापासून भारताने सतर्क राहण्याचं आवाहन अर्थतज्ञांद्वारा केलं जात आहे. मात्र आता रशिया आणि युक्रेन युद्धाचा जर पूर्णविराम झाला नाही, तर देशच नव्हे तर जगाच्या अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होईल असेही ब्लूमबर्गच्या रिपोर्टद्वारा सांगण्यात आले आहे.
तेव्हा आता या युद्धाचा काय निर्णय होतो आणि कुठली परिस्थिती जगावर ओढवेल, हे काळच ठरवेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस