नवी दिल्ली, ३१ ऑक्टोंबर २०२२: Tata Blackbird Suv टाटा मोटर्सने ग्रहकांच्या मनात एक विशिष्ट स्थान बनवलंय. देशात कार निर्माते अनेक कंपनी आहेत, पण टाटा स्वदेशी ब्रँड झालाय, तसंच टाटा आपल्या नवनवीन कार बाजारात आणत असते. त्यातच टाटा आता आपली आगामी ‘एसयूव्ही ब्लॅकबर्ड’ लवकरच भारतात आणण्याच्या तयारीत आहे. ही एसयूव्ही बाजारपेठेत क्रेटा आणि वेन्यूला जबरदस्त टक्कर देणार आहे. ही नवीन ब्लॅकबर्ड कंपनीच्या स्वतःच्या नेक्सॉन एसयूव्हीवर आधारित असंल. टाटा ब्लॅकबर्ड कूपे डिझाइन लँग्वेज सोबत भारतात एन्ट्री करणार आहे.
Tata Blackbird SUV चे संभाव्य इंटिरियरसमोर आलेल्या माहितीनुसार कारमध्ये फ्री स्टँडिंग टच स्क्रीन असेल ते मध्यभागी सेट केलं जाईल. तसेच टू स्पोक स्टिअरिंग व्हील मिळंल. याशिवाय सनरूफचाही त्यात समावेश करण्यात आलाय. १०-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट करणारे असणार आहे.
कारचं वैशिष्ट्ये
कारचं खास वैशिष्ट्यं म्हणजे यामध्ये तुम्हाला ऑल ब्लॅक थीम मिळेल. शक्यता आहे की, टाटा याला थ्री रो सीटिंग सोबत बाजारात उतरवू शकते. तसंच कारमध्ये तुम्हाला ८.८ इंचाचा टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम आहे. ज्याला आपण वायरलेस अॅप्पल कार प्ले आणि अँड्रॉयड ऑटो सोबत कनेक्ट करू शकतो. तसंच या मद्ये वायरलेस चार्जर, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, पनारोमिक सनरूफ आणि लेदर सीट सारखे फीचर्स आहेत. कारचे डिझाईन टाटा नेक्सन आणि हॅरियर यांच्यापासून प्रेरित असल्याचं दिसून येत आहे. यामध्ये DRL ही पाहता येणार असून आकर्षक बंपर असणार आहे.
इंजिन पॉवर
Tata Blackbird SUV चे इंजिनTata Blackbird SUV च् १.२ लीटर थ्री सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन मिळंल, जे १३० bhp पावर आणि १७८ Nm टॉर्क जनरेट करू शकंल, तसंच दुसऱ्या इंजिन पर्याय मध्ये १.५ लिटर चार सिलेंडर टर्बोचार्ज्ड डिझेल असंल. जो ११८ bhp पावर आणि २७० Nm टॉर्क जनरेट करू शकतो.
कारची किंमत
टाटा कंपनीनं अजूनही नवीन टाटा ब्लॅकबर्ड एसयूव्ही बद्दल कोणतेही विधान केलेलं नाही, परंतु या वाहनाची एक्स-शोरूम किंमत सुमारे ११ लाख रुपयांपासून सुरू होणार असल्याची शक्यता आहे. आणि टाटा ब्लॅकबर्ड एसयूव्ही लॉन्चबद्दल बोलायचं झालं तर, टाटा ब्लॅकबर्ड एसयूव्ही या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षी ऑटो एक्सपोमध्ये सादर केली जाणार आहे.
तसंच Tata Blackbird SUV च्या तुलनेत Hyundai Creta ही सध्या त्याच्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकली जाणारी SUV ठरलीय. गेल्या महिन्यात एकूण १२,८६६ युनिट्सची विक्री झालीय. तसंच गेल्या वर्षी याच सप्टेंबरमध्ये कंपनीनं ८,१९३ युनिट्सची विक्री केली, जी वार्षिक आधारावर ५७ टक्क्यांनी जास्त आहे. Creta ची रचना स्टायलिश आणि खूप प्रीमियम आहे. Creta चे इंजिन अतिशय स्मूथ आणि उत्तम परफॉर्मन्स देण्यास सक्षम आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत १०.४४ लाख रुपयांपासून सुरू होते. तर Hyundai Creta ला टक्कर देण्यासाठी Tata Blackbird SUV भारतीय बाजारात येतेय.
न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे