सोन्याच्या दरात होऊ शकते मोठी घसरण, जाणून घ्या किती घसरतील किमती?

पुणे, २ नोव्हेंबर २०२२: जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा मूड बनवत असाल तर थोडी प्रतीक्षा केली तर तुमचा फायदा होईल. गेल्या अनेक महिन्यांपासून सोन्याचे भाव एकास मर्यादित रेंजमध्ये फिरतायत. ऑगस्ट-२०२० मध्ये सोन्यानं ५६,००० रुपये प्रति १० ग्रॅमचा विक्रमी उच्चांक गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या दरांमध्ये सातत्यानं घसरण होत राहिली, जी अद्यापही कायम आहे.

वास्तविक, जागतिक मंदीमुळं सोन्याच्या दरात आणखी घसरण अपेक्षित आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिल (WGC) च्या मते, ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान भारतात सोन्याचा खप गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे एक चतुर्थांश कमी होऊ शकतो.

ग्रामीण भागातील मागणी घटण्याची चिन्हं

सणासुदीच्या काळात विक्रीत नक्कीच वाढ झाली होती. पण जे आकडे अपेक्षित होते, ते यशापर्यंत पोहोचले नाही. सोन्याच्या किमती घसरण्यामागं महागाई हे प्रमुख कारण असल्याचं मानलं जातंय. विशेषतः ग्रामीण भागात सोन्याची मागणी कमी होऊ शकते. ग्रामीण भागातील लोक या हंगामात मोठ्या प्रमाणात दागिन्यांची खरेदी करतात.

जगातील सर्वाधिक सोन्याचा खप असलेल्या देशांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. चीन पहिल्या स्थानावर आहे. तज्ज्ञांच्या मते, मागणी घसरल्यानं किमतींवर परिणाम होऊ शकतो, जे दोन वर्षांहून अधिक काळातील नीचांकी पातळीवर व्यापार करत आहेत.

आतापर्यंतच्या उच्चांकावरून सोनं ६००० रुपयांनी स्वस्त झालंय. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, ०१ नोव्हेंबर रोजी सराफा बाजारात सोनं ५०,४६० रुपयांनी स्वस्त झालं, जे गेल्या महिन्याच्या सुरुवातीला ५२ हजारांवर पोहोचलं होतं. त्याच वेळी, ऑगस्ट-२०२० मध्ये सोन्यानं ५६,००० रुपयांची विक्रमी पातळी गाठली.

किरकोळ महागाई दरात सातत्याने वाढ होतेय. सप्टेंबरमध्ये भारताचा वार्षिक चलनवाढीचा दर ७ टक्क्यांच्या वर होता. भारतातील सोन्याच्या मागणीपैकी दोन तृतीयांश मागणी सामान्यतः ग्रामीण भागातून येते. (WGC नुसार, डिसेंबर तिमाहीत भारताची सोन्याची मागणी गेल्या वर्षीच्या ३४३.९ टनांवरून सुमारे २५० टनांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. या घसरणीमुळं भारताचा एकूण सोन्याचा वापर २०२२ मध्ये सुमारे ७५० टनांपर्यंत पोहोचू शकतो, जो गेल्या वर्षीच्या ३४३.९ टन होता. वर्षाच्या ७९७.३ टन पेक्षा ६% कमी आहे.

तथापि, ग्राहक आणि मध्यवर्ती बँकेच्या खरेदीच्या आधारावर, जागतिक सोन्याची मागणी कोविडपूर्व पातळीपर्यंत पोहोचलीय. सप्टेंबर तिमाहीत सोन्याची मागणी वर्षानुवर्षे २८ टक्क्यांनी वाढून १,१८१ टन झाली आणि २०२२ मध्ये आतापर्यंत मागणी गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत १८ टक्क्यांनी वाढलीय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा