मध्य रेल्वेची वाहतुक ठप्प, नेरुळ स्थानकात मालवाहू गाडीच्या इंजिनात बिघाड

मुंबई,३ नोव्हेंबर २०२२: नेरुळ रेल्वे स्थानकात मालवाहू गाडीच्या इंजिनात बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतुक विस्कळीत झाली आहे. मागील एका तासापासून कर्जत-मुंबई रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून दुरुस्तीसाठी रेल्वेचे कर्मचारी नेरुळ स्थानकात आल्याची माहिती मिळाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेवरील उपनागरीय रेल्वे विलंबाने धावत असल्याने प्रवाशांमध्ये मध्य रेल्वेच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी आहे आणि अजून त्यात भर पडली, आज सकाळपासून परत मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. यामुळे कर्जतहून मुंबईला येणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वाहतूकीवर परीणाम झाला.

रेल्वेचे कर्मचारी नेरळ स्थानकात दुरुस्तीसाठी पोहचले असून त्यांचे युद्ध पातळीवर काम सूरु केले असून,लवकरच वाहतूक सूरळीत करण्यात येईल असे सांगितले जात आहे. परंतू मुंबईकडे जाणाऱ्या उपनगरी गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांचा बराच खोळंबा होत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा