स्टेट बँकेच्या कॅशियरच्या काउंटरवरुन १७ लाख रुपये गेले चोरीस गर्दीचा घेतला फायदा

37

नाशिक, ४ नोव्हेंबर २०२२: नाशिक शहरातल्या पंचवटीतील पेठ फाटा येथील स्टेट बँकेच्या कॅशियरनं त्याच्या टेबलवर ठेवलेल्या ५० लाखांपैकी १७ लाख रुपयांच्या नोटांचे बंडल चोरट्यानं गर्दीचा फायदा घेऊन चोरुन नेल्याची धक्कादायक घटना समोर आलीय.

ग्राहक म्हणून बॅंकेत आलेल्या भामट्यानं सर्व कर्मचारी कामकाजात गुंग असल्याची संधी साधून चोराने चक्क पिशवीत पैशाची बंडलं भरत बॅंकेच्या पैशांवर हात साफ केला. भारतीय स्टेट बॅंकेचे प्रबंधक युवराज दौलत चौधरी राहणार सावरकरनगर, गंगापूर रोड यांनी पंचवडी पोलिसांत तक्रार दाखल केलीय.

मिळालेल्या माहितीनुसार शाखेचे कॅशियर राजेंद्र बोडके यांनी कॅश काउंटरवर जमा झालेली ५० ते ५५ लाख रुपयांची रोख रक्कम मोजून शेजारच्या टेबलावर ठेवलेली होती. बॅंकेचे कर्मचारी आपआपल्या कामात गुंग होते त्याच वेळी ग्राहक म्हणून बॅंकेत आलेल्या भामट्यानं गर्दीचा फायदा घेत बंडल पिशवित भरले आणि निघून गेला.

नंंतर पुन्हा हिशोब करताना बंडल कमी झाले आहेत हे कॅशियरला समजलं व सीसीटिव्ही तपासले असता त्यात एकजन पिशवित बंडल भरत असताना दिसून आला. पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे व सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार घटनास्थळी दाखल झाले आणि सीसीटिव्ही फुटेज तपासून चोरट्याचा तपास सुरु केलाय.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर