किडनी, मुत्राशय यामध्ये स्टोन तयार होणे हा काही नविन आजार राहिलेला नाही. विविध रसायनापासून तयार झालेले छोटेछोटे कण एकत्र जमा झाल्यानंतर किडनी स्टोन तयार होतो.
स्टोन – कॅल्शियम फॉस्फेट, कॅल्शियम ऑक्सोलेट, यूरिक अॅसिड, आणि अमोनियम फॉस्फेट यासारख्या रसायनापासून स्टोन तयार होतो. जड पाणी आणि क्षारयुक्त पाण्यापासून तयार झालेले पदार्थ आहारात घेतल्यानंतर किडनी स्टोन होण्याचा धोका जास्त असतो.
किडणी स्टोनची लक्षणे- पोटात आचानक कळ निघणे. सातत्याने पोट दूखणे. जळजळ होणे. उलटी होणे. लघवीसोबत रक्त येणे याला हिमेटूरिया म्हटले जाते. वारंवार लघवी येणे ही स्टोन होण्याची लक्षणे आहेत.
एका अहवालानूसार, किडनी स्टोन असणाऱ्यांची संख्या भारतामध्ये ७० लाख आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि गुजरात या राज्यांना स्टोन बेल्ट म्हणून ओळखले जाते. आधुनिक मशिन्सच्या सहाय्याने स्टोन बरा करण्याचा दावा केला जात असला तरी तो खर्च सर्वसामान्य लोकांना झेपण्यासारखा नाही.
तंत्रज्ञाचा उपयोग केल्यानंतरही स्टोन पूर्णपणे बरा होईल याची खात्री देता येत नाही. विविध आजारांवर हजारो वर्षापासून आदिवासी परंपरागत औषधी वनस्पतीपासून उपाय करत आले आहेत. स्टोनसह इतर आजारांवर आदिवासी करत असलेले उपाय काय आहेत. याविषयी आज आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत.
द्राक्ष आणि तरवटाच्या बी सम प्रमाणात घेऊन ( ६ ग्रॅम) बारीक वाटून घ्या. नंतर हे मिश्रण गरम पाण्यात ३० मिनिट उकळून घ्या. हे मिश्रण थंड झाल्यानंतर दिवासातून कमीत-कमी दोन वेळेस स्टोनचा आजार असणाऱ्या व्यक्तिने प्यायल्यानंतर स्टोनपासून सुटका मिळू शकते.
स्टोनवरचे उपाय –
लघवी करताना जळजळ होत असेल तर गुळवेल आणि आवळ्याचे मिश्रण तयार करा. यामध्ये आले पाच ग्रॅम, अश्वगंधा पाच ग्रॅम टाका. हे मिश्रण १०० मिली लीटर पाण्यात उकळून घ्या. हा काढा दोन दिवसाच्या आतंराने दोन महिने प्यायल्यानंतर किडनी स्टोन बरा होतो.
दुर्वाच्या मुळ्या, अंबी हळदीचे कंद, मालकांगनीचे पाने समान मात्रेत घ्या. याला बारीक वाटून या मिश्रणाचा रस तयार करा. हे मिश्रण मधासोबत घेतल्यानंतर स्टोन बरा होतो.
अश्वगंधा नवस्पतीचा रस प्यायल्यानंतर स्टोन बरा होतो. अश्वगंधा वनस्पतीच्या मुळ्याचा रस व आवळ्याचा रस सम प्रमाणात घ्या. मूत्राक्षय आणि लघवी करताना होणारा त्रास होणार नाही.
‘सौफ’ चा चहा
अर्धा चमचा सौफ बारीक करून घ्या. दोन कप पाण्यात पाच मिनिट उकळून घ्या. सौफचा चहा दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्यानंतर स्टोनपासून होणार त्रास बंद होतो.
लघवी करताना त्रास होत असेल तर आवळ्याचा रस प्यायल्यानंतर त्रास होत नाही. आवळ्याचा रस, साखर आणि तुपचे मिश्रण घेतल्यानंतर स्टोनचा त्रास होत नाही.
आवळ्याचा रस आणि इलायची याचे मिश्रण गरम करा. उलटी, चक्कर येणे, पोटात दुखणे याचा त्रास होत नाही.