मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे,

मुंबई,९ नोव्हेंबर २०२२: मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट पुन्हा एकदा वाहतूकीसाठी बंद करण्याच्या हालचाली सूरु झाल्या आहेत. या घाटाचे मागील वर्षोभरापासून चौपदरीकरणाचे काम सूरु आहे. पण प्रशासनाने अजून घाट वाहतुकीसाठी बंद कधीपासून करणार आहे ती तारीख सांगितली नाही.

पावसाळ्यात दरडी कोसळण्यामुळे हा घाट एक ते दोन महीने बंद ठेवण्यात आला होता. आणि कामही बंद होते. त्यामुळे आता घाटातील चौपदरीकरणाचा आणि रुंदीकरणाचे काम जलद गतीने व्हावे यासाठी या घाटावरची वाहतूक पुन्हा काही दिवस बंद ठेवण्याचे नियोजन प्रशासनाकडून सूरु आहे.

याबाबत अधाप तारीख निश्चित झालेली नाही. मात्र तसे नियोजन राष्ट्रिय महामार्ग व ठेकेदार कंपनीकडून केले जात आहे. परशुराम घाट केव्हापासून बंद ठेवायचा, ते अधाप ठरले नाही. मात्र घाटातील वाहतूक बंद ठेवून चीरणीमार्गे वाहतूक वळवण्याचे ठरले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा