मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी भारतीय जनता पक्षाने एकमताने पक्षाचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती केली.
आज विधानसभेच्या सत्रात अध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
फडणवीस यांच्या नियुक्तीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्यांनी या प्रस्तावावेळी भाषण देखील केले. त्यानंतर सभागृहातील इतर नेत्यांनी फडणवीस यांचे अभिनंदन केले.
आपण गेले २५-३० वर्षे एकत्र आहोत. मित्र होते ते विरोधात बसले आहेत. विरोधी पक्ष सोबत आले आहेत. या अर्थाने खरे तर विरोधक कुणीच नाही.
विरोधी पक्षनेता माझा मित्रच आहे. तेव्हा दोघांमध्ये अंतर ठेवायला नको. कोणाचे वाभाडे काढण्याची आपली परंपरा नाही,’ असे आवाहन देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या अभिनंदनाच्या ठरावावेळी केले.