फिफा विश्वचषकात अनपेक्षित निकालांना सुरवात

पुणे, २३ नोव्हेंबर २०२२ : जगभरातील चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले ते फिफा विश्वचषक २०२२ ने. अनेक चाहते सामना पाहण्यासाठी कतारमध्ये पोचले आहेत. तर खेळाडूंसाठी कतारमध्ये समुद्रकिनाऱ्यावरील आलिशान जहाज बुक केले असून, खेळाडू आपल्या मित्रपरिवारासह तिथे मुक्कामी आहेत. काल सौदी अरेबिया टीमने अर्जेंटिना टीमचा पराभव केला आणि देशभरात जल्लोषमय वातावरण निर्माण झालं. विजयानंतर सौदी अरेबियाचे चाहते खूप खूश होते. त्यातील एक चाहता म्हणाला, “सौदी अरेबिया टीमने सांघिक खेळ केला; परंतु अर्जेंटिनाची टीम एका खेळाडूवर अवलंबून असल्याने त्यांचा पराभव झाला असेल.”

कालचा सौदी अरेबियाच्या यशामुळे तेथील सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबिया टीमने अर्जेंटिनाचा पराभव केल्यानंतर देशात सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे चाहत्यांच्या आनंदाला अधिक उधाण आलं आहे. सौदी अरेबिया आणि अर्जेंटिना यांच्यात २-१ अशी मॅच झाली. कालची मॅच झाल्यानंतर सोशल मीडियावरही अनेक मिम्स व्हायरल झाले आहेत. चाहत्यांनी विजयानंतर जोरदार जल्लोष केल्याचं पाहायला मिळत आहे.

काल सौदी अरेबियाच्या विजयाचे नायक सलेम अल-दवसारी आणि सालेम अलशेहरी आहेत. दोघांनीही प्रत्येकी एक गोल केला आणि त्यामुळेच सौदी अरेबियाचा विजय झाला. तर अर्जेंटिनाकडून एक गोल करणारा खेळाडू होता कर्णधार लिओनेल मेस्सी. कालचा सौदी अरेबियाचा विजय हा ऐतिहासिक विजय ठरला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा