कर्नाटक : कर्नाटक येथील एका शेतकऱ्याने माकडांच्या त्रासांपासून सुटका मिळवण्यासाठी एक भन्नाट शक्कल लढवली आहे. नालुरू गावातील श्रीकांता गोंडा यांनी माकडांच्या त्रासाला वैतागून कुत्र्याला चक्क वाघ बनवले आहे. त्यांनी आपल्या कुत्र्याला वाघाप्रमाणे रंगवले आहे.
चार वर्षांपुर्वी श्रीकांता गोंडा यांनी भटकल जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला वाघासारखी बाहुली वापरताना पाहिले होते.
त्यानंतर माकडांनी शेतात येणे सोडून दिले होते. याच कल्पनेतून त्यांनी आपल्या कुत्र्याच्या संपुर्ण शरीरावर वाघाप्रमाणे रंग लावला आहे
गोंडा यांची ही आयडिया चांगलीच काम करत असून, आता माकडांचे शेतात येणे बंद झाले आहे.
याबाबत गोंडा यांनी सांगितले की, कुत्र्याला वाघासारखे बनविण्यासाठी त्यांनी पेंट नाही तर डायचा वापर केला आहे. जे एका महिन्यानंतर निघून जाईल. याचबरोबर त्यांनी आपल्या शेतात कुत्र्याचे पोस्टर देखील लावले आहेत. हे पोस्टर बघून कुत्री शेतात घुसत नाहीत.