‘किसी का भाई, किसी की जान’ चित्रपटातील सलमान खानच्या लूकवर चाहते फिदा!

मुंबई, ४ डिसेंबर २०२२ : सलमान खानचा नवीन चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून, सलमान खानने त्याचे नवीन लूक सोशल मीडियावरून पोस्ट केले आहेत. भाईजानचा नवीन लूक समोर आला आहे. सलमान खानने पोस्ट केलेल्या पोस्टमध्ये बॅकग्राउंड डान्सर दिसत असून, सलमान खान स्टायलिश पोजमध्ये उभा आहे. सिनेमाचे नाव याआधी ‘कभी ईद, कभी दिवाली’ असे ठेवण्यात आले होते; मात्र यानंतर ते बदलून ‘किसी का भाई, किसी की जान’ हे नाव फायनल करण्यात आले.

अभिनेता सलमान खान याचा प्रत्येक सिनेमातील लूक चर्चेत असतोच. लांब केस, डोळ्यावर गॉगल ढिंच्याक जॅकेट असा काहीसा सलमान खानचा या चित्रपटातील लूक दिसतोय. आणि नेहमीप्रमाणेच त्याच्यात तो डॅशिंगही दिसतोय. सलमानचा या लूकवर त्याचे चाहते फिदा झाले आहेत. वाळवंटातील सूट दाखवत काही दिवसांपूर्वीच सिनेमाच्या टायटलची घोषणा देखील सलमान खानने केली होती. त्यामुळे सलमान खानचा लूक आणि टायटल बघून सिनेमाची उत्सुकता प्रचंड ताणली गेली आहे. त्यातून या सिनेमात पहिल्यांदाच सलमान खान आणि पूजा हेगडे या दोघांची जोडी बघायला मिळणार आहे.

सलमान आपल्या चित्रपटातून अनेक नवीन कलाकारांना संधी देतो. वेगवेगळे चेहरे वेगवेगळ्या भूमिकांमधून चाहत्यांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो. या सिनेमातून पहिल्यांदाच शहनाझ गिल चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे. त्याचप्रमाणे पलक तिवारी, मालविका शर्मा, सिद्धार्थ निगम हे कलाकार देखील असणार आहेत. तर अजून एक चेहरा म्हणजेच ‘बिग बॉस १६’मधील स्पर्धक अब्दू रोझिक याने सुद्धा या चित्रपटात छोटी भूमिका साकारल्याची चर्चा आहे. तर फरहाद सामजी हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.अखेर हा सिनेमा पुढील वर्षी २०२३ मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा