नाशिक, ४ डिसेंबर २०२२ शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांना नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी भाजपकडून केली जात आहे.
मालेगाव मधील भाजपचे नेते अद्वय हिरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून दादा भुसे यांची नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
अद्वय हिरे यांच्या या मागणीमुळे बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातील वाद पुन्हा एकदा समोर आली आहे.
नेमके काय आहे प्रकरण ?
मालेगाव मधील बोरे आंबेदरी येथील पाण्याची चारी बंद करण्याचा निर्णय भुसे यांनी घेतल्याने शेतकरी आणि भाजप नेते संतप्त झाले आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील व् शेतकऱ्यांची जमीन ओसाड होऊन पिके उद्ध्वस्त होण्याची भीती आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.











































.jpeg?updatedAt=1704378350820)
