Exit Polls: गुजरातमध्ये भाजप सलग सातव्यांदा सत्तेवर… हिमाचलमध्ये भाजपला मिळणार कडवी लढत

Exit Polls, ६ डिसेंबर २०२२: गुजरातमध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष प्रचंड बहुमतानं सत्तेवर येऊ शकतो. दुसरीकडं हिमाचल प्रदेशात चुरशीची लढत झालीय. काँग्रेस सत्ताधाऱ्यांना कडवी टक्कर देताना दिसतोय. सोमवारी सायंकाळी उशिरा जाहीर झालेल्या एक्झिट पोलमधूनही हीच बाब समोर आलीय. मात्र, प्रत्यक्ष निकाल ८ डिसेंबरला जाहीर होणार आहेत.

आता सत्ता कोणाच्या हाती येणार हे ८ डिसेंबरला निकालावरून स्पष्ट होणार आहे. गुजरात विधानसभा निवडणूक सोमवारी दोन टप्प्यात संपली. हिमाचल प्रदेशमध्ये १२ नोव्हेंबरलाच निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली. एक्झिट पोलनुसार गुजरातमध्ये भाजपला ११७-१४८ जागा मिळू शकतात. काँग्रेसला ३०-५१ आणि आम आदमी पक्षाला ३-१३ जागा मिळण्याची शक्यता आहे. हिमाचलमध्ये भाजपला २४-४० तर काँग्रेसला २६-४० जागा मिळतील, असं सांगण्यात येतंय. आप’ला ०-३ जागा मिळू शकतात.

काय म्हणतोय एक्झिट पोल

• न्यूज एक्स-जन की बातच्या एक्झिट पोलनुसार भाजप गुजरातमध्ये पूर्ण बहुमतानं सरकार स्थापन करू शकते. यावेळी भाजपला ११७-१४०, काँग्रेसला ३४-५१ आणि आम आदमी पार्टीला ६-१३ जागा मिळू शकतात.

• रिपब्लिक टीव्ही आणि पी-मारक्यूच्या एक्झिट पोलमध्येही भाजप गुजरातमध्ये पूर्ण बहुमतानं सरकार स्थापन करेल असा दावा केलाय. यावेळी भाजपला १२८-१४८, काँग्रेसला ३०-४२ आणि आम आदमी पार्टीला २-१० जागा मिळू शकतात, असं सांगण्यात आलंय.

• टीव्ही-९ गुजरातीच्या एक्झिट पोलनुसार गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपची लाट पाहायला मिळालीय. येथे सत्ताधारी पक्षाला १२५-१३०, काँग्रेसला ४०-५० आणि आम आदमी पक्षाला ३-५ जागा मिळण्याचा अंदाज आहे.

• इंडिया टुडे ग्रुप-अॅक्सिस माय इंडियाच्या सर्वेक्षणानुसार गुजरातमध्ये भाजपला १२८-१४४ जागा, काँग्रेसला ३०-४२ आणि आम आदमी पार्टीला २-१० जागा मिळू शकतात.

हिमाचल प्रदेशात भाजपला मिळणार कडवी लढत

• हिमाचल प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेसची चुरशीची लढत आहे. इंडिया टुडे – अॅक्सिस माय इंडियानुसार, राज्यात भाजपला २४-३४ जागा मिळू शकतात, तर काँग्रेसला ३०-४० जागा मिळू शकतात. तर दुसरीकडे आम आदमी पक्षाचा सफाया झालाय.

• इंडिया टीव्ही-मॅट्रिक्सच्या सर्वेक्षणानुसार, भाजपला ३५-४० जागा मिळू शकतात, तर काँग्रेसला ३६-३१ जागा मिळू शकतात.

• न्यूज एक्स-जन नुसार, भाजपला ३२-४० जागा मिळू शकतात, तर काँग्रेसला २७-३४ जागा मिळू शकतात.

• रिपब्लिक टीव्ही-मार्क्यूनुसार, भाजपला ३४-३९, काँग्रेसला २८-३३ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा