नवी दिल्ली, ७ डिसेंबर २०२२ :भारतीय रिझर्व्ह बॅंकेने आज तीन दिवसीय चलनविषयक धोरण समितीचे निर्णय जाहीर केले. RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो दरासह इतर दरांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सामान्य लोकांच्या कर्जाचा ईएमआय वाढणार आहे. RBI समितीच्या ६ पैकी ५ सदस्यांच्या बहुमताने रेपो दर ०.३५ टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे आरबीआयचे गर्व्हरन शक्तिकांत दास यांनी जाहीर केला आहे.
शशिकांत दास म्हणाले, आपण आणखी एका आव्हानात्मक वर्षाच्या अखेरीस आले आहोत. देशातच नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये महागाईचा दर वाढला आहे. पुढे ते म्हणाले, आर्थिक वर्ष २०२३ मध्ये जीडीपी चा दर ६.८ टक्के असू शकतो. त्याचबरोबर आर्थिक वर्ष २०२४ च्या पाहिल्या तिमाहीच्या पहिल्या तिमाहीत सीपीआय ५ टक्के असू शकतो.
दरम्यान, RBI ने सलग पाचव्यांदा व्याजदरात वाढ केली आहे. RBI ने मागील तीन MPC बैठकांमध्ये १.९० टक्क्यांनी वाढ केली आहे. यापैकी मे महिन्यात ४० बेसिस पॉइंट्स आणि जून आणि ऑगस्टमध्ये ५० – ५० बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली आहे. सध्या रेपो रेट ५.९० टक्के आहे आणि आज आरबीआय रेपो रेट ०.३५ टक्क्यांनी वाढ झाल्याने रेपो दरात ६.२५ टक्क्यांवर गेला आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.