श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव उद्यापासून

पिंपरी-चिंचवड, ९ डिसेंबर २०२२ : श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव शनिवार (ता. १०) ते बुधवार (ता. १४) या कालावधीत चिंचवडगाव येथे साजरा होणार आहे. यानिमित्त चिंचवड देवस्थान ट्रस्ट, महापालिका व ग्रामस्थांतर्फे मंदिरालगतच्या मैदानात विविध धार्मिक, सांस्कृतिक, समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचा ‘जीवन गौरव पुरस्कार’ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी ट्रस्टचे विश्वस्त जितेंद्र देव, हभप आनंद तांबे, ॲड. राजेंद्र उमाप, विनोद पवार, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे उपस्थित होते.

शनिवार (ता. १०) ते बुधवार (ता. १४) या कालावधीत
पुढीलप्रमाणे कार्यक्रम होणार आहेत-
शनिवारी (ता. १०) ः संजीवन समाधी महोत्सवाचे उद्घाटन- सायंकाळी ५ वाजता. ह.भ.प पंकज महाराज गावडे यांचे व्याख्यान- सायंकाळी ७ वाजता. पं. दासोपंत स्वामी आळंदीकर यांच्या सोबत सिद्धेश उंडाळकर व ऋषिकेश उंडाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे पखवाज सहवादन- रात्री ८ वाजता.

रविवारी (ता. ११) ः स्थानिक मंडळांचे भजन- दुपारी १२ वाजता. दशावतारी नाट्य- दुपारी ४ वाजता. इंद्रनील बंकापुरे, संस्कार भारती यांचा ‘मंदिरांच्या देशा’- सायंकाळी ६.३० वाजता. अमर ओक, नीलेश परब, सत्यजित प्रभू यांचा ‘अमर बन्सी’- रात्री ८. ३० वाजता.

सोमवारी (ता. १२) ः भजन- दुपारी १२ वाजता. बाळकृष्ण महाराज वसंतगडकर यांचे कीर्तन- सायंकाळी ५ वाजता. उत्तरा केळकर यांचे सुगम संगीत- रात्री ८.३० वाजता.

मंगळवारी (ता. १३) ः ज्ञानदा सिद्धेश पंडित यांचे कीर्तन- दुपारी ४ वाजता. इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांना जीवन गौरव पुरस्काराचे वितरण- सायंकाळी ६ वाजता. केतकी माटेगावकर, ऋषिकेश रानडे यांचे सुगम संगीत- रात्री ८.३० वाजता.

बुधवारी (ता. १४)ः संजीवन समाधी महापूजा- पहाटे ४.३० वाजता. सनई-चौघडा वादन- सकाळी ६ वाजता.
श्री मोरया गोसावी संजीवन समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी. त्यानंतर चरित्र पठण- सकाळी ७ वाजता. ढोल-ताशा पथकाची मानवंदना- सकाळी ८ वाजता. रामायणाचार्य समाधान महाराज शर्मा यांचे काल्याचे कीर्तन- सकाळी ९ वाजता. महाप्रसाद- दुपारी १२ वाजता. श्री मोरया गोसावी संजीवन समाधीसमोर व श्री मंगलमूर्ती वाडा येथे धुपारती व महोत्सवाची सांगता- रात्री १० वाजता.

तरी जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री मोरया गोसावी देवस्थान ट्रस्ट, चिंचवड यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा