निजामाबाद, १० डिसेंबर २०२२ तेलंगणातील निजामाबाद येथील बडा बाजार परिसरात स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात एक जण जखमी झाला आहे.
फॉरेस्ट टाऊन पोलीस ठाण्याचे एसएचओ विजय बाबू यांनी सांगितले की, ही घटना काल रात्री दहाच्या सुमारास घडली. स्फोटाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
पुढे ते म्हणाले, त्या व्यक्तीने केमिकलने भरलेला डबा हलविल्याने अचानक स्फोट झाला असे तपासात समोर आले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.












































