पुणे, ता. १९ डिसेंबर २०२२ : फुटबॉल जगतातील सगळे पुरस्कार मिळाले; परंतु त्याच्या खजिन्यात विश्वकरंडकाचा अभाव होता. लिओनल मेस्सी ज्या स्वप्नाच्या शोधात इतकी वर्षे अथक परिश्रम करीत होता ते अखेर पूर्ण झाले. त्याबरोबरच ग्रुप स्टेज, राऊंड १६, उपांत्यपूर्व फेरी, उपांत्य फेरी अन् फायनल एकाच स्पर्धेत या सर्व टप्प्यांत गोल करणारा मेस्सी जगातील पहिला खेळाडू ठरला.
मेस्सीने वर्ल्डकप स्पर्धेत १२ गोल केले आहेत आणि ८ गोल साहाय्य आहे. १९६६ पासूनच्या विश्वकरंडकाच्या इतिहासातील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. मेस्सीने अंतिम फेरीत गोल करताच तो विश्वकरंडकाच्या साखळी, राऊंड ऑफ १६, क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि फायनलमध्ये गोल करणारा तो विश्वकरंडकाच्या इतिहासातील पहिला खेळाडू बनला. मेस्सीने फायनलमध्ये गोलसाठी असिस्ट करीत विश्वकरंडकाच्या इतिहासात सर्वाधिक ९ असिस्ट करणारा खेळाडू बनला आहे. त्याने डिएगो मॅराडोनाला (८) मागे टाकले.
२०१४ नंतर २०२२ च्या वर्ल्डकपमध्ये दुसरा ‘गोल्डन बॉल’ जिंकणारा मेस्सी पहिला खेळाडू. मेस्सीचा फिफा विश्वकरनडकमधील १७ वा विजय, जर्मनीच्या मिरोस्लाव क्लोसेची बरोबरी मेस्सी हा विश्वकरंडकाची फायनल खेळणारा जगातील दुसरा वयस्कर खेळाडू बनला आहे. रविवारी त्याचे वय ३५ वर्षे ११७ दिवस होते. यापूर्वी स्विडनचा निल्स लिएढोम हा ३५ वर्षे २६४ दिवसांचा असताना १९५८ ची फायनल खेळला होता. ग्रुप स्टेज, राऊंड १६, उपांत्यपूर्व फेरी, उपांत्य फेरी अन् फायनल एकाच स्पर्धेत या सर्व टप्प्यांत गोल करणारा मेस्सी जगातील पहिला खेळाडू ठरला.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सतीश पाटील