या खेळाडूच्या बुडत्या कारकिर्दीला दिल्ली कर्णधाराने दिली साथ

मुंबई, २४ डिसेंबर २०२२ : इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामासाठी कोची येथे होणाऱ्या मिनी लिलावापूर्वी एका खेळाडूच्या नावाची जोरदार चर्चा झाली. १५ वर्षांपूर्वी भारतीय क्रिकेट संघात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा उत्कृष्ट गोलंदाज ईशांत शर्मा. ईशांत शर्मा हा भारतीय क्रिकेटपटू ‘टी २०’च्या मैदानावर पुन्हा एकदा उतरणार आहे. ईशांतची भारतीय क्रिकेटचा ३४ वर्षे अनुभव असलेला वेगवान गोलंदाज अशी ओळख आहे. २०१९ ते २०२१ पर्यंत ईशान दिल्लीसोबत राहिला आहे. गेल्या मोसमात कोणत्याही संघाने त्याला विकत घेतले नव्हते; परंतु यावेळी होम टीम दिल्लीने या खेळाडूला मिनी लिलावात अवघ्या ५० लाखांच्या मूळ किमतीत खरेदी केले.

२००८ मधील ‘टी २०’मध्ये इशांत शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ईशांतसोबतच डेव्हिड हसी आणि प्रवीण कुमार यांनीही ‘टी २०’ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर मेलबर्नमध्ये ईशांतने ऑस्ट्रेलियाविरुद्ध महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली पहिला ‘टी २०’ सामना खेळला. ज्या सामन्यात भारताला नऊ विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होत.

३४ वर्षांच्या त्याच्या कारकिर्दीत आततापर्यंत १४ ‘टी २०’ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने कामगिरी केली आहे. त्याने कसोटीत १०५ सामन्यांत ३११ बळी घेतले आहेत. तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ८० सामन्यांमध्ये ११५ बळी घेत वेगवान गोलंदाजी केली आहे. एवढंच नाही तर ‘टी-ट्वेंटी’ कारकीर्द बघता एकूण १४५ सामन्यांत त्याने ११७ विकेट घेतल्या आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा