डावखुरे असाल तर हे वाचा….

तुम्ही डावखुरे आहात काय? असे असाल तर हे नक्की वाचा.आज आपल्याकडे डावखरे पणाबद्दल अनेक तर्क वितर्क लावले गेले आहेत. शक्यतो डावखरी असणारी माणसे ही खूप हुशार आणि चपळ असतात. आज समजून घेऊ या नेमके डावखरे असल्याची कारणे.
या डावखरेपणाबाबत येल विद्यापीठाने संशोधन केले आहे. या संशोधनात म्हटले आहे की, उजव्या हाताने काम करणाऱ्यांच्या तुलनेत डाव्या हाताने काम करणारे लोक ‘स्किझोफ्रेनिया’ विकाराचे बळी जास्त ठरू शकतात.
हा एक प्रकारचा मनोविकार आहे. जिथे डिप्रेशन आहे तिथे तो दोन्ही प्रकारांत आढळून येतो. अमेरिकेतील १० टक्के लोकसंख्या डाव्या हाताने कामे करते. ही बाब उल्लेखनीय आहे.
येल चाइल्ड स्टडी सेंटरचे संशोधक जेडोन वेब यांनी स्किझोफ्रेनियाने बाधित ४० टक्के लोक डावखुरे असल्याचे म्हटले आहे. जेडोन हे शिशू आणि किशोरवयीन मुलांवर संशोधन करणारे मनोवैज्ञानिक आहेत. ते म्हणतात की,जे सायकोसिस असतात ते वास्तवापासून दूर राहतात.
त्यांचे अंधविश्वास त्यांच्यावर ताबा मिळवतात. एक प्रकारे बुद्धिभ्रंश झालेल्या स्थितीत हे लोक राहतात. जेडोन वेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी १०७ लोकांवर संशोधन केले.

यामध्ये कमी कमाई असलेल्या शहरी लोकांवर हे संशोधन केले गेले. असेही दिसून आले की, डाव्या हाताने कामे करणारे सायकोसिसचे रुग्ण असतात. संशोधन करताना हे लोकांना विचारले गेले की ते कोणत्या हाताने लिहितात? या केवळ एकाच प्रश्नावरून बरेच काही स्पष्ट होते, असे वेब म्हणतात.
यानंतर साधारण विश्लेषण केले गेले. ‘सेज’ या नियतकालिकात हा संशोधन निष्कर्ष देण्यात आला आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा