फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांनी विधानसभेत केली ‘ही’ मागणी

फलटण, २८ डिसेंबर २०२२ : महाराष्ट्रातील आदर्श दलितवस्ती गाव मॉडेल व सामजिक न्याय भवन समाजकल्याण विभागाचा निधी वरील स्थगिती उठवण्यात यावी, अशी मागणी फलटणचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दीपक चव्हाण यांनी नागपूर येथे सुरु असलेल्या विधानसभा हिवाळी अधिवेशनात केली आहे.

पुढे ते म्हणाले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती शताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र सरकारने दलित वस्ती आदर्श गाव मॉडेल योजना सुरू केली होती. परंतू ती योजना बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ही योजना पुन्हा एकदा चालू करण्यात यावी तसेच समाज कल्याण विभागाकडून प्रत्येक गावात सामाजिक न्याय भवन बांधण्यात यावे, अशी मागणी देखील चव्हाण यांनी यावेळी केली आहे.

  • देवेंद्र फडणवीस म्हणाले…

दरम्यान, त्यांच्या या मागणीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ही योजना अतिशय महत्त्वाची असून, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करुन ही योजना पुनर्जीवित किंवा वेगळ्या नावाने सुरू केली जाईल. या संदर्भात विचारविनिमय करून लवकरात लवकर योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासनही फडणवीस यांनी यावेळी दिले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : आनंद पवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा