मोड आलेल्या कडधान्यात अनेक पॅकारचे पोषक घटक असतात. ज्याच्या सेवनाने अनेक व्याधिना तुम्ही दूर ठेवू शकता.मोड येण्याच्या प्रक्रियेने धान्यात असणारे खनिज द्रव्य सहजरीत्या शरीरात मिसळतात.
मोड आलेल्या धान्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. यामुळे पाचन प्रक्रिया सुधारते. दीर्घ काळापर्यंत अशा अन्नाचा आहारात समावेश असल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.
अन्नात असणारे पोषक तत्त्व अंकुरित केल्याने वाढतात. मोड आलेल्या धान्यात जास्त प्रमाणात कॅल्शियम असते. परिणामी, हाडे मजबूत होतात.
अशी कडधान्ये खाल्ल्याने शरीरात असणारे हानिकारक अँसिड्स सहज बाहेर काढण्यास मदत मिळते.
आहारामुळे तुम्ही अनेक आजारांपासून लांब राहू शकता.