नवी दिल्ली, २९ डिसेंबर २०२२ : भारतात कोरोना जास्त काळ टिकू नये म्हणून सरकारने नियमावली जाहीर केली आहे; तसेच भारतातील नागरिकांच्या लसीकरणावरही भर दिला जात आहे. थोडक्यात, भारत सरकारकडून सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. तरीही पुणे, मुंबई यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर काही दिवसांपूर्वीच पुण्याच्या विमानतळावर कोरोना रुग्ण सापडला असल्याचे समोर आले. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवी यांनी ट्विट करीत एका मोठ्या निर्णयाची घोषणा केली.
केंद्रीय आरोग्य शमंत्री यांनी ट्विट केल्याप्रमाणे एक जानेवारीपासू चीन, हॉंगकॉंग, जपान, साऊथ कोरिया, सिंगापूर आणि थायलंड येथून येणाऱ्या यात्रिकांना आयटीपीसीआर चाचणी करणे गरजेचे असून, प्रवासापूर्वी त्यांना चाचणीचा निकाल हवाई सुविधा पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे.
यापूर्वी देखील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नागरिकांच्या प्रवासावर निर्बंध घालण्यात आले होते. चीन, अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया या देशांमध्ये कोरोना वाढत असल्याने पुन्हा एकदा भारत सरकारला हा निर्णय घ्यावा लागला आहे. बुधवारपर्यंत अमेरिकेने चीनमधून आलेल्या प्रवाशांना कोरोना चाचण्या बंधनकारक केल्या होत्या, त्याचप्रमाणे आता भारतातदेखील प्रवासासाठी वेगवेगळे निर्बंध लादले गेले आहेत. त्याचप्रमाणे कोरोनाची लाट तीव्र नसली, तरीही योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे, असेही आरोग्य मंत्रालयाचा अधिकाऱ्यांकडून वारंवार सांगितले जात आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे