धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १५ हजारांचा बोनस; मुख्यमंत्र्यांची घोषणा

नागपूर, २९ डिसेंबर २०२२ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधिमंडळात धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. या घोषणेनुसार, सर्व नोंदणीकृत शेतकर्‍यांना प्रति हेक्टरी १५ हजारांचा बोनस दिला जाणार आहे.

पुढे ते म्हणाले, याचा लाभ धान उत्पादक जिल्ह्यातील ५ लाख शेतकऱ्यांना होणार आहे. हा बोनस ऑनलाईन पद्धतीने थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. धान खरेदीत कोणतीही अनियमितता झाल्याची तक्रार आलेली नाही. केंद्र शासनाने राज्याला १५ लाख मेट्रीक टन धान खरेदीस मंजूरी दिली आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा