अमेरिकेत ६ वर्षाच्या चिमुकल्याचा शिक्षिकेवर गोळीबार

वॉशिंग्टन, ७ जानेवारी २०२३ : अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये शुक्रवारी एका प्राथमिक शाळेत विद्यार्थ्याने शिक्षकेवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यामध्ये एक शिक्षिका गंभीर जखमी झाली असून, शिक्षिकेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हर्जिनियातील न्यूपोर्ट न्यूज शहरातील प्राथमिक शाळेत ही घघटना घडली आहे. एका सहा वर्षाच्या मुलाने शिक्षकेवर बंदुकीने गोळीबार केला. दरम्यान, या गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे.

व्हर्जिनियाचे महापौर फिलिप जोन्स यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पोलिसांनी या प्रकरणी एका विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. तर न्यूपोर्टचे पोलीस प्रमुख स्टीव्ह ड्रू यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी दोनच्या सुमारास आम्हाला गोळीबाराच्या संदर्भात कॉलवर माहिती मिळाली. माहिती मिळताच आमचे पथक घटनास्थळी पोहोचले. आणि विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील तपास करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्राथमिक शाळेचे अधीक्षक जॉर्ज पार्कर यांनी सांगितले की, ही घटना निराशाजनक असून, सोमवारी शाळा बंद ठेवली जाणार आहे. तसेच आपल्याला विद्यार्थ्यांंना चांगले संस्कार आणि सुरक्षित ठेवण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा