प्रसिद्ध गीतकार नासिर फराज यांचे निधन

मुंबई, १६ जानेवारी २०२३ : बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार नासिर फराज यांचे निधन झाले. नासिर यांनी बॉलिवूड चित्रपटांसाठी एकापेक्षा एक गाणी लिहिली आहेत. त्यांनी आपल्या गीतांनी रसिक श्रोत्यांची मने जिंकली आहेत.

गीतकार नासिर फराज यांचे जवळचे मित्र गायक मुजतबा अजीज नजा यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून फराज यांचे काही फोटो शेअर करून त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘आज नासिर फराज साहेब आपल्यात नाहीत. भारतीय चित्रपट विश्वातील प्रतिष्ठित गीतकारांमध्ये त्यांची गणना होत होती. नसीर साहेबांसोबत माझा १२ वर्षांचा परिचय होता. बाजीराव मस्तानी (२०१५) आणि ‘हेमोलिम्फ’ (२०२२) सारख्या चित्रपटांमध्ये आम्ही एकत्र अविस्मरणीय काम केले.’

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून नासिर आजारी होते. नासिर यांना हृदयाशी संबंधित काही आजार होते आणि सात वर्षांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती. रविवारी अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि सायंकाळी ६.३०च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

नासिर फराज यांनी ‘एक बुरा आदमी’ सारख्या चित्रपटात त्यांनी गीतकार म्हणून काम केले. तर काइट्स, क्रिश, काबिल, एतबार, लव्ह ॲट टाईम्स स्‍क्‍वेअर आणि बाजीराव मस्तानी सिनेमासाठी त्यांनी एकापेक्षा एक गाणी लिहिली. ‘तुम मुझे बस यूं ही’, ‘मैं हूं वो आसमान’, ‘कोई तुमसा नहीं’, ‘काबिल हूं’ आणि ‘चोरी चोरी चुपके’ यांसारखी अनेक हीट गाणी बॉलिवूडला दिली आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा