पुणे : आज सर्रास एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा पैसे देण्यासाठी रोख रक्कम देण्याऐवजी डिजीटल पेमेंटचा वापर वाढला आहे. त्यामुळे जवळ रोकड ठेवण्याची गरज पडत नाही.
दरम्यान, आपली विविध कामे यामुळे सोपी झाली असली तरी ऑनलाइन फसवणुकीमुळे धोकाही वाढला आहे. ई वॉलेटचा वापर करणाऱ्यांना हॅकर्सकडून टार्गेट केले जात आहे.
आपणास एखाद्या वस्तूची गरज असल्यास त्याबद्दल आपण नेटवर सर्च करतो. त्यानंतर मिळालेल्या नंबर किंवा वेबसाइटवर संपर्क करतो. त्याचाच वापर करून ई वॉलेटवरून फसवणूक केली जाते. अशी होते फसवणूक फेक लिंकवर तुम्हाला काय हवे आहे असे विचारले जाते. त्यानंतर एक फॉर्म भरायला सांगून ट्रायल किंवा टोकन मनी म्हणून ५-१० रुपये पाठवण्यास सांगितले जाते.
यातूनच आपली माहिती, फोन नंबर व बँक डिटेल्सची माहिती घेतली जाते. आपण पैसे पाठवल्यानंतर मिळालेल्या माहितीवरून खात्यावरची रक्कम काढली जाते.
याबाबत सायबर अधिकाऱ्यांनी सांगितले, ई वॉलेटवर अनेक हॅकर्सची नजर आहे. इंटरनेटवर अनेक खोट्या लिंक असतात. आपण काहीही सर्च करतो. तेव्हा येणाऱ्या लिंकमध्ये त्यांचीही एक लिंक व नंबर दिसतो. समोर असणारे खरे की खोटे हे सहजासहजी समजत नाही. त्यामुळे खात्रीशीर माहिती असलेल्या अधिकृत लिंकवरूनच अशा प्रकारचे व्यवहार व माहितीची देवाण घेवाण करावी.