रत्नागिरी, २४ जानेवारी २०२३ : ‘भंडारी युवा प्रतिष्ठान’तर्फे आयोजित ‘भंडारी श्री २०२३’ वर्ष सहावे, रविवारी (ता. २२ जानेवारी) स्वा. सावरकर नाट्यगृहात पार पडली. स्पर्धा रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या नियमानुसार झाली. स्पर्धेला दरवर्षीप्रमाणे रत्नागिरीकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला.
स्पर्धेचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, निवृत्त जिल्हाधिकारी, ज्येष्ठ साहित्यिक श्री. भारत सासणे साहेब यांचे हस्ते, सह्याद्री वाहिनीचे माजी संचालक श्री. जयू भाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत; तसेच आर.डी.सी.सी. बॅंक संचालक श्री. गजानन तथा आबासाहेब पाटील, उद्योजक श्री. जितेंद्र बागकर, श्री. मधुकर नागवेकर, मिऱ्याच्या सरपंच सौ. आकांक्षा नीलेश किर, सौ. दयाताई चवंडे, राजापूर अर्बन बॅंक मॅनेजर श्री. बिर्जे साहेब, श्री. वैभवजी कांबळे, श्री. बावा नाचणकर, श्री. नरेंद्र हातिस्कर, डॉ. मयूरेश पाटील, श्री. विकीशेठ जैन, श्री. भूपेश भाटकर, श्री. तेजस भाटकर, श्री. कांचन मालगुंडकर, श्री. भाई विलणकर, राष्ट्रीय पंच श्री. संदेश चव्हाण आदी मान्यवारांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
भंडारी मर्यादित गटात किताबाचा मानकरी श्री. आशिष विलणकर, रत्नागिरी, तर खुल्या गटात समीर मोरे, चिपळूण विजेते ठरले. बेस्ट पोझर कु. प्रणव कांबळी व हर्षद मांडकर, राजापूर, उगवता तारा कु. अमेय किर व सुरेश भाताडे, रत्नागिरी, तर जिद्दी भंडारी, कु. नीलेश तोडणकर विजेते ठरले.
भंडारी युवा प्रतिष्ठानच्या सर्वच कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे व सर्व स्पाॅन्सर्स यांच्यामुळे स्पर्धा यशस्वी ठरली. शेवटी सर्वांचे आभार अध्यक्ष श्री. नीलेश नार्वेकर यांनी मानले.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : जमीर खलफे