आधारकार्डच्या आधारे आता पैसेही काढता-पाठवता येणार; डिजिटल व्यवहार आणखी सुलभ

नवी दिल्ली, २४ जानेवारी २०२३ : देशातील प्रत्येक नागरिकाकडे आज आधारकार्ड आहे. तुम्ही आधारकार्डचा वापर फक्त ओळखपत्र म्हणूनच नाही, तर आधारकार्डच्या मदतीने तुम्ही पैसेही काढू शकता. त्याचबरोबर आता तुम्ही फक्त आधार क्रमांकाच्या मदतीने एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफरही करू शकता. आधार सक्षम पेमेंट सिस्टीमच्या मदतीने तुम्ही डिजिटल व्यवहार करू शकता.

‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ने आधार क्रमांकाच्या मदतीने एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे हस्तांतरित करण्यासाठी ही प्रणाली विकसित केली. ही प्रणाली आधार क्रमांक, आयआरएस स्कॅन आणि फिंगरप्रिंटसह व्हेरिफिकेशन करून ‘एटीएम’द्वारे आर्थिक व्यवहारांना परवानगी देते. ही प्रणाली अतिशय सुरक्षित पर्याय समजली जाते. कारण त्यासाठी तुम्हाला बँक तपशील देण्याची आवश्यकता नाही.

जर तुम्हाला या सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचे आधारकार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. तुमचे खाते बँकेशी जोडलेले नसेल तर तुम्ही या प्रणालीतून पैसे काढू शकणार नाही. या प्रणालीअंतर्गत, व्यवहार करण्यासाठी कोणत्याही ओटीपी आणि पिनची आवश्यकता नाही. एक आधारकार्ड अनेक बँक खात्यांशी जोडले जाऊ शकते.

एईपीएस प्रणालीच्या मदतीने तुम्ही बँकेतून पैसे काढू शकता. यासोबतच बॅलन्स तपासणे, पैसे जमा करणे आणि आधारकार्डवरून निधी हस्तांतरित करणे इत्यादींचा समावेश आहे. याशिवाय मिनी बँक स्टेटमेंट आणि ‘ईकेवायसी’द्वारे फिंगर डिटेक्शन इत्यादी सुविधा मिळू शकतात.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा