विश्वासघातामुळे शिवसेना आणि महाराष्ट्र दोघांची बदनामी झाली; उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल

मुंबई, २७ जानेवारी २०२३ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरू मानले जाणारे नेते स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यात वैद्यकीय शिबिराचे उद्घाटन केले. आनंद दिघे यांच्या लोकप्रियतेमुळे ठाणे ही अविभाजित शिवसेनेसाठी सर्वांत सुरक्षित जागा ठरली होती; पण गेल्यावर्षी जूनमध्ये शिंदे यांच्या बंडखोरीनंतर या भागातील पक्षाचा मोठा पाठिंबा शिंदे यांच्या गटाला गेला.

उद्धव ठाकरे यांचा दौरा आणि दिघे यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी आयोजित वैद्यकीय शिबिराकडे ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पुनर्गठण करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. आनंद मठात त्यांनी दिघे यांना पुष्पांजली अर्पण केली. आनंद मठ हा ठाण्यातील अनेक दशकांपासून शिवसेनेच्या उपक्रमांचा बालेकिल्ला आहे. यावेळी गेल्यावर्षी जूनमध्ये शिंदे आणि शिवसेनेतील ३९ आमदारांची बंडखोरी आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्याचा संदर्भ देत उद्धव ठाकरे म्हणाले, की विश्वासघातामुळे शिवसेना आणि महाराष्ट्र दोघांची बदनामी झाली.

यावेळी पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, की सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीतही शिवसेना आपल्या ध्येयापासून डगमगली नाही, याचे मला समाधान आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्त्वानुसार आम्ही ८० टक्के सामाजिक कार्य व २० टक्के राजकीय कार्य करीत आहोत. जे सोडून गेले त्यांचा शोक करण्याची गरज वाटत नाही. त्यामुळे खरे शिवसैनिक आमच्या पाठीशी आहेत. ते मशाल पेटवतील

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा