फलटण, २९ जानेवारी २०२३ : येथील माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून फलटण तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने ‘नातं मैत्रीचं, आरोग्य सर्वांचे’ या उक्तीस पाईक होऊन साजरा केलेल्या हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला भगिनींची उपस्थिती होती.
यावेळी डॉ. भाग्यश्री पाटील कराड यांनी महिलांमधील कॅन्सर या विषयासंदर्भात सखोल मार्गदर्शन करून उपस्थित भगिनींच्या आरोग्याविषयक समस्यांविषयी ‘स्लाईड शो’द्वारे अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिली; तसेच मुधोजी हायस्कूलचे माजी प्राचार्य श्री. येवले सर यांनी नारीशक्ती या विषयावरील आपल्या विचारांतून भगिनींचे मनोबल, आत्मविश्वास वाढविण्यास नक्कीच प्रयत्न केला. शेवटी फलटण तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : आनंद पवार