भांडवलशाहीमुळे कामगार हक्कांवर गदा : प्रकाश आंबेडकर

नाशिक, ६ फेब्रुवारी २०२३ : भांडवलशाही, उच्चवर्णीय व सत्ताधारी हे एकमेकांच्या हातात हात घालून सत्ताकारण करीत आहेत म्हणून कामगारांवर विविध प्रकारचे अन्याय होऊन त्यांचे हक्क डावलले जात आहेत, असा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला.

तपोवन आयोजित राज्य स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेच्या पहिल्या राज्यव्यापी वार्षिक अधिवेशनाच्या उद्धाटनाप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून संघराज रूपवते, अरुण भालेराव, कार्याध्यक्ष राजाभाऊ बोढारे, आशोक सोनावणे, प्रकाश वागरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

वीज कंपनीतील संघटनांनी कामगार हिताबरोबरच सामाजिक हित जोपासण्याची गरज आहे. त्यांनी कामगारांबरोबर शेतकरी व इतर विविध क्षेत्रांतील कष्टकरी वर्गाच्या बाजूने उभे राहणे गरजेचे आहे. भांडवलशाही आणि जातिभेद हे समाजव्यवस्थेच्या विरोधात आहे, हे आपल्याला मांडता आले पाहिजे.

आपण भांडवलशाही विरोधात उभे आहे, हे म्हणणे आपल्याला सांगता आले पाहिजे. आंबेडकरांनी जातिअंताची चळवळ आदेशित केलेली असताना आज जातीय आरक्षणासाठी निघणारे मोर्चे हे एकसंध भारताच्या दृष्टीने फलदायी नाही, असेही परखड मत त्यांनी मांडले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा