रत्नागिरी, ७ फेब्रुवारी २०२३ : सलग दोन वेळा भंडारी श्री शरीरसौष्ठव स्पर्धा जिंकणार्या आशिष विलणकर याचा मारुती मंदिर, रत्नागिरी येथील भाई विलणकर्स जिमकडून शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
२०२२ व २०२३ या सलग दोन वर्षांची भंडारी श्री शरीरसौष्ठव स्पर्धा जिंकून मानाची गदा कायमस्वरूपी पटकाविणार्या आशिष विलणकर हा भाई विलणकर्स जिममध्ये व्यायाम करतो. त्याच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल मारुती मंदिर, रत्नागिरी येथील भाई विलणकर्स जिममध्ये सत्कार करण्यात आला. मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष आनंद तापेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भाई ऊर्फ श्रीकृष्ण विलणकर, बॉडी बिल्डींग असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सदानंद जोशी, जिमच्या संचालिका ऋचा विलणकर, माधुरी मयेकर, जमीर खलफे, समीर साळवी, राजेश सुपल, दीपेश पवार व इतर अनेक व्यायामपटू उपस्थित होते.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : जमीर खलफे