औरंगाबाद, ८ जानेवारी २०२३ : शिवसेना (ठाकरे गट) नेते आमदार आदित्य ठाकरे यांची तालुक्यातील महालगाव येथील सभा उधळली गेल्याने त्यांना तेथून काढता पाय घेण्याची नामुष्की ओढवली. एवढेच नव्हे, तर ते सभेसाठी आले असताना त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे सभास्थळी एकच गोंधळ उडाला.
ही घटनातालुक्यातील महालगाव येथे काल रात्री ८ ते १० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाला असून, खबरदारी म्हणून गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रत्येक ठिकाणी पोलिस गस्त देखील घालत आहेत.
शिवसंवाद यात्रेनिमित्त ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास तालुक्यातील महालगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज पुताळा परिसरात सभा आयोजित करण्यात आली होती. तत्पूर्वी गावातील तरुणांनी रमाई जयंतीनिमित्त मिरवणूक काढली होती. त्यावेळी हा सर्व प्रकार घडला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर











































